गावाविषयी माहिती

ग्रामपंचायत उसर ही महाराष्ट्र राज्यातील पालघर जिल्ह्यातील वाडा  तालुक्यातील एक प्रगतशील ग्रामपंचायत आहे.सदर ग्रामपंचायत  उसर महसूल गाव आहे. तर मोहोट्याचापाडा, पळसपाडा, शिंदेवाडी, कोलकेवाडी हे पाडे आहेत.

१.उसर ग्रामपंचायत हे पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यात असलेले एक ग्रामपंचायत आहे, जेथे प्रामुख्याने मराठी बोलीभाषा बोलली जाते, पिनकोड ४२१३१२ आहे आणि ते वाडा तालुक्याच्या जवळ (सुमारे 19 किमी) आहे, तर जिल्ह्याचे ठिकाण पालघर सुमारे 58 किमी दूर आहे, हि ग्रामपंचायत  नैसर्गिक सौंदर्यासाठी ओळखली जाते. ग्रामपंचायत हद्दीतून तानसा  नदी जात असून, ती गावाची जीवनदायीनी आहे.

२. २०११ च्या जनगणनेनुसार 1202 लोकसंख्या आहे, हे गाव उत्तर कोकणातील वाडा तालुक्यात येते आणि एक शांत, ग्रामीण भाग आहे, जिथे शेती आणि स्थानिक जीवनशैली आढळते. 

३.  ST, SC, OBC, Open लोकवस्ती असून, वाडा तालुक्याच्या उत्तरेकडील भागात येते. शेती प्रधान आणी औद्योगिक क्षेत्र म्हणून ओळखले जाते.

मुख्य माहिती:

सन २०११ च्या जनगणनेनुसार या ग्रामपंचायत ची  लोकसंख्या सुमारे 1202  आहे. ग्रामपंचायत हद्दीमध्ये मध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा 3, अंगणवाडी केंद्रे ०4,ग्रामपंचायत कार्यालय 01  तसेच डावजई माता मंदिर,गावदेवी मंदिर 02, श्री दत्त मंदीर,हनुमान मंदीर, दर्गा  अशी शैक्षणिक व सामाजिक सुविधा उपलब्ध आहेत.

ग्रामपंचायत क्षेत्रात पिण्याच्या पाण्याच्या सोईसाठी हातपंप, विद्युतपंप , विहिरी तसेच  नळपाणी पुरवठा योजना कार्यरत आहेत,

गावातील बहुतांश लोक शासकीय कर्मचारी असून काही लोक  शेती ,भाजीपाला लागवड सुद्धा करतात. ग्रामपंचायत हद्दीत मोठ्या प्रमाणावर औद्योगिक कारखाने आहेत त्यामुळे गावातील लोकांना गावातच रोजगार उपलब्ध झाला आहे. उसर ग्रामपंचायतीत विविध शासकीय योजना प्रभावीपणे राबविल्या गेल्या आहेत. घरकुल योजना अंतर्गत लाभार्थी यांना घरकुल चा  लाभ मिळाला आहे. स्वच्छ भारत अभियान अंतर्गत  गावाने संपूर्ण खुले शौचमुक्त (ODF प्लस) दर्जा मिळवला आहे. जलसंधारण व पाणीपुरवठा योजना अंतर्गत गावात पाणीपुरवठा नियमित करण्यात आला आहे. तसेच तंटामुक्ती गाव मोहीम अंतर्गत देखील उत्कृष्ट काम केले आहे. ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच व सदस्य मिळून गावाचा सर्वांगीण विकास घडवून आणत आहे.  ग्रामपंचायतीचे निर्णय लोकसहभागातून घेतले जातात.उसर  ग्रामपंचायत आज वाडा  तालुक्यातील एक आदर्श व सर्वांगीण विकासाकडे वाटचाल करणारी ग्रामपंचायत  म्हणून ओळखली जाते.

भौगोलिक स्थान

उसर  ग्रामपंचायत हि वाडा  तालुक्याच्या ठिकाणापासून सुमारे 19 कि.मी. अंतरावर वसलेले आहे.  गावाचे एकूण लागवडी योग्य  क्षेत्रफळ 303 हेक्टर  आहे. ग्रामपंचायतीमध्ये ३ वार्ड आहेत. एकूण 258 कुटुंबे येथे वास्तव्यास असून, लोकसंख्या 1202  आहे. त्यामध्ये   पुरुष 617  व  महिला 585  यांचा समावेश होतो. गावाचा भौगोलिक विस्तार प्रामुख्याने एका बाजूला डावजई डोंगर असून शेतीयोग्य जमीन मोठ्या प्रमाणात आहे. तसेच गावालगत कारखाने आहेत व गावाला लागून तानसा नदी आहे त्या मधून  व बोरवेल मधून गावाला पाणीपुरवठा होतो. येथे हवामान उष्णकटिबंधीय आहे.  उन्हाळ्यात तापमान साधारणतः ४२° से. पर्यंत जाते, तर हिवाळ्यात २५° से. पर्यंत खाली येते. पावसाळ्यात सरासरी ८० ते ९० से.मी. पर्जन्यवृष्टी होते. ग्रामपंचायत उसर येथे भात शेती प्रामुख्याने केली जाते.

लोकजीवन

ग्रामपंचायत उसर येथील गावाचे लोकजीवन साधे, श्रमप्रधान व पारंपरिक आहे. शेती हा येथील मुख्य व्यवसाय भात शेती व हंगामी भाजीपाला व रब्बीपिके काही प्रमाणावर घेतली जातात. शेतीसह शेळीपालन काही लोक दुग्धव्यवसाय, यामध्येही कार्यरत आहेत. त्या सोबत सुशिक्षित गाव असून मोठ्या प्रमाणात नोकरदार वर्ग आहे.

गावात विविध सामाजिक, सांस्कृतिक व धार्मिक परंपरा जोपासल्या जातात. वर्षभरात होणारे उत्सव, सण आणि मोहोट्याचापाडा येथे होणारा गांवदेवी पालखी सोहळा दोन दिवसाचा असुन गावाच्या एकतेचे दर्शन घडवतो. गणेशोत्सव, होळी, दिवाळी, नवरात्र,गोकुळाष्टमी तसेच स्थानिक देवतांच्या पूजांना विशेष महत्त्व आहे.

येथील लोक मेहनती, मदतशील व अतिथी देवो भव  या विचाराने वावरणारे आहेत. स्त्रियांचा सहभाग ग्रामविकास व स्वयंसाहाय्य गटांद्वारे मोठ्या प्रमाणात दिसून येतो. तरुण वर्ग शिक्षण, खेळ आणि रोजगाराच्या संधी शोधत प्रगतीच्या दिशेने वाटचाल करीत आहे.ग्रामपंचायत उसर लोकजीवनात पारंपरिक ग्रामीण संस्कृतीसोबतच आधुनिकतेची झलकही दिसते, ज्यामुळे गावाचा विकास आणि एकात्मता दोन्ही जोपासले जातात.

लोकसंख्या

घटक संख्या
लोकसंख्या 1202  
पुरुष 617
स्त्री 585
एकूण 1202  

संस्कृती व परंपरा

ग्रामपंचायत उसर गावाचे सांस्कृतिक जीवन समृद्ध आणि विविधतेने नटलेले आहे. येथे वर्षभर विविध धार्मिक,श्रावण सप्ताह, सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात.

गणेशोत्सव, नवरात्र, दिवाळी, होळी,यांसारखे सण गावात उत्साहाने साजरे केले जातात. या सणांमुळे गावातील मुलं, तरुण व वयोवृद्ध व महिला सर्वच वयोगट एकत्र येऊन आनंदोत्सव साजरा करतात. गावात लोककला, कीर्तन, भजन, हरिपाठ  आणि पारंपरिक खेळ यांचा विशेष प्रभाव दिसून येतो. पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या परंपरा जपतानाच नवीन पिढी आधुनिकतेशी जुळवून घेते.

स्त्रियांचा सहभाग ग्रामविकासात तसेच सांस्कृतिक उपक्रमांमध्ये मोठ्या प्रमाणावर असतो. स्वयंसहाय्य गटांद्वारे महिला सामाजिक व आर्थिक प्रगतीत योगदान देतात.यामुळे उसर गावाचे लोकजीवन परंपरा आणि आधुनिकता यांचा सुंदर संगम साधत आजही एकात्मतेने टिकून आहे.

प्रेक्षणीय स्थळे

ग्रामदैवताचे मंदिर - गावातील प्रमुख जागृत डावजई माता मंदिर,गावदेवी मंदिर, श्री दत्त मंदीर, हनुमान मंदीर  गावकऱ्यांचे श्रद्धास्थान असून येथे दरवर्षी पालखी सोहळा व सप्ताहासारखे धार्मिक कार्यक्रम व पायी दिंडी सोहळा   उसर ते त्र्यंबकेश्वर आयोजित केले जातात.   

जवळची गावे

ग्रामपंचायत उसर हि वाडा तालुक्यातील असल्यामुळे आजूबाजूला अनेक गावे आहेत. ही गावे सामाजिक, शैक्षणिक, व्यावसायिक व सांस्कृतिकदृष्ट्या जोडलेली आहेत.

आसपासची प्रमुख गावे आहेत.

सापरोंडे , कोंढले, कुडूस, उचाट